Skip to main content

लायफ्रेरियन – IB शालेय ग्रंथालय क्षेत्राची सेवा गुणवत्ता उंचावणारी समर्पित संस्था.

SHARE THIS POST

शालेय शिक्षण पद्धतीमध्ये ग्रंथालयाचे स्थान किती महत्वाचं आहे याची आपण सर्वांना जाणीव आहेच.

ग्रंथालय हे शिक्षण संस्थाचे  हृदय आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये ग्रंथालयांचा मोलाचा वाटा आहे.

लायफ्रेरियन – मुंबई ही एक मान्यताप्राप्त संस्था आहे. जवळपास २०० – IB क्षेत्रातील अनुभवी व प्रशिक्षीत ग्रंथपाल एकत्रीत कार्यान्वित असणारा दिग्गजांचा हा समुह आहे.

ग्रंथालय सेवा संदर्भात जागतिक दर्जाची गुणवत्ता जास्तीत जास्त प्रभावी व परिपूर्ण कशी होईल या संदर्भात प्रामाणिक प्रयत्न करणारी समर्पित व्यावसायीक ग्रंथपालांची ही संस्था.शालेय ग्रंथपालांना माहितीपर व आवश्यक अशा विविध विषयांवर त्वरीत व योग्य मार्गदर्शन ईथे उपलब्ध असते. 

आज भारतातील सर्व राज्यातून तसेच जगाच्या विविध प्रदेशातून IB ग्रंथपाल ह्या संस्थेशी जोडले गेले आहेत.वेळोवेळी विविध विषयांवर गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन सत्र संस्थेच्या माध्यमातून आयोजित केले जातात. ही एक सुव्यवस्थित तज्ञ ग्रंथपालांची सजग संस्था आहे.

लायफ्रेरियन ह्या संस्थेची सुरवात कशी झाली हे जाणून घेण्यास तुम्हाला नक्कीच आवडेल – तर मित्रांनो सुमारे सहा वर्षापूर्वी तीन सहृदय मित्रांनी एक whats up ग्रुप निर्माण केला. त्या तीनही व्यक्ती ग्रंथालय क्षेत्रातील प्रशिक्षित व अनुभवी – मिसेस हिरु भोजवाणी ( मुख्य ग्रंथपाल –  अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे )

मिसेस कुंतल भंडारे ( मुख्य ग्रंथपाल – इकोल मोंडियल वर्ल्ड स्कूल मुंबई) व श्री अनिल माने ( मुख्य ग्रंथपाल एज्यूब्रिज इंटरनॅशनल स्कूल मुंबई ).त्यानंतर अनिलने ग्रुपला एक समर्पक असे नाव दिले – लायफ्रेरियन

लायब्रेरियन ह्या शब्दाला खुप न्याय देणारा प्रति समानार्थी शब्द लायफ्रेरियन.त्या शब्दाच्या मागे त्यांची भावना खूप प्रामाणीक आहे . ज्यांच्यामधे जीवन आहे – चेतना व उर्जा आहे आणि ज्ञान समायीत करण्याची तत्परता आहे. प्रेम व कर्तव्यनिष्ठा आहे.

त्यानंतर IB शालेय क्षेत्रातील एक एक असे तज्ञ ग्रंथपाल  संपर्कात येत राहीले. लोग साथ आते गये और कारवाँ बनता गया…आणि हा प्रवास असाच सुरु आहे.

लायफ्रेरियन असोशियेशन मुंबई यांच्यामार्फत (ग्रामीण ग्रंथालय उन्नतीसाठी – उपक्रम) Outreach Program हा एक महत्वकांक्षी उपक्रम.त्या संदर्भात काही माहिती देण्यास मला नक्कीच खुप आनंद वाटेल.

प्रकल्प क्रमांक १) अपनी शाळा – मानखुर्द मुंबई 

अपनी शाळा मानखुर्द हा लायफ्रेरियन चा पहिला प्रकल्प आहे. शहरातील गरीब वस्तीतील मुलांसाठी ग्रंथालय सुविधा पुरविणे आणि ऑनलाईन ग्रंथालय वर्ग व उपक्रम आयोजित करणे / तेथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षीत करणे / ग्रंथालय सुविधा संगणकीकृत करणे तसेच कोहा लायब्ररी सॉफ्टवेअर सेट अप करणे.

अश्या अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. वेळोवेळी गरजेनुसार प्रत्यक्ष साईटला भेट दिली जाते.हा प्रकल्प पूर्ण कार्यान्वित असून सुव्यवस्थित सुरु आहे.

 

प्रकल्प क्रमांक २) जिल्हा परिषद शाळा – चाबके तलावली – जिल्हा पालघर महाराष्ट्र राज्य.

जिल्हा परिषद शाळा चाबके तलावली पालघर जिल्हा विक्रमगड हा आदिवासी बहुल भाग आहे. इयत्ता पहिली ते सातवी पर्यत वर्ग असून सुमारे २१५ विध्यार्थी संख्या असलेली मराठी माध्यमाची ही शाळा आहे.

मुख्याध्यापक तसेच शिक्षक सहकारी विनम्र व सहकार्य करणारे आहेत. 

लायफ्रेरियन उपक्रम २ अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी –

१) ग्रंथालय सुविधा  – ग्रंथालयासाठी पुस्तके / फर्निचर

२) संगणक व इंटरनेट सुविधा

३) ग्रंथालय सॉफ्टवेअर – कोहा सेट अप

४) ग्रंथालय वर्ग / स्टोरी टेलिंग/ रिड अलाऊड / स्टोरी व्हिवर असे विविध उपक्रम online आयोजीत करणे.

लायफ्रेरियन संस्थेच्या वतीने विद्यार्थांसाठी दोन अत्याधुनिक संगणक इंटरनेट सह शाळेला प्रदान करण्यात आले.मिसेस हिरु यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली – मिसेस कुंतल , मिसेस चैताली व मिसेस रुपाली यांची तज्ञ टिम योजनेवर उत्तम काम करते आहे.हा प्रकल्प कार्यान्वीत झाला असून लवकरच पूर्णत्वास जाईल. सध्या कोविड महामारीचे संकट असल्याने  शासकीय निर्बंध आहेत त्यामुळे काम करण्यास बऱ्याच मर्यादा आहेत.

ह्या लेखाचा शेवट करताना  लायफ्रेरियन विषयी मला मागील तीन वर्षा पासून जे अनुभव

ले त्यानुसार मी काही प्रामाणीक मत नोंदवू ईच्छितो.

अनुभवी ,तज्ञ व तांत्रीक दृष्टीने सक्षम आणि तत्परता असलेला मध्यवर्ती संघ हे ह्या ग्रुपच बलस्थान आहे. कुशल नेतृत्व , सुसंवाद हे त्यांच अजून एक वैशिष्ट्य आहे.उच्च शिक्षीत अनुभवी आणि त्यांच्या क्षेत्रातील अधिकार प्राप्त असताना सुद्धा ,त्यांना आपल्या सामाजिक बांधीलकीची योग्य जाणीव आहे. ग्रंथालय क्षेत्रात जागतीक दर्जा व सेवा गुणवत्ता प्रदान करत असताना ग्रामीण गरिब विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे वाचन शिक्षण संस्कार  

मिळावेत . त्या मुलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी व प्रगत जगाशी समरूप होता येईल ह्या बददल त्यांची अगदी प्रामाणीक तळमळ व मानवतावादी दृष्टीकोन ह्यामुळे पूर्ण खात्रीने ही संस्था त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करेल.

लायफ्रेरियन ह्या संस्थेला त्यांच्या पुढील कार्यासाठी खुप शुभेच्छा.

By Ravindra Jadhav ( Assistant Librarian – École Mondiale World School – Mumbai )

 


SHARE THIS POST

Leave a Reply