Skip to main content

लायफ्रेरीयन असोसिएशन आणि मी / आम्ही

SHARE THIS POST

 मेंढपाल –  मेंढ्यांचे रक्षण करणारा तो मेंढपाल . तसेच द्वारपाल –  घराचे किंवा एखाद्या दुकानाचे रक्षण करणारा म्हणजे द्वारपाल. अगदी तसेच मागील १० ते १५ वर्षापुवी “ग्रंथपाल”  या शब्दांचा अर्थही असाच होता. ग्रंथांचे रक्षण करणारा म्हणजे ग्रंथपाल.

मी लायफरेरीयन असोसिएशन ची सभासद झाले आणि चित्रच बदलले. या असोसिएशन मध्ये जवळपास आम्ही २०० आई बी ग्रंथपाल आहोत. इथे कोणाला कोणतीही ग्रंथालयासंबंधी समस्या असो वा कोणतीही अडचण असो इथे प्रत्येकजण एकमेकांना मदत करतो.

माझेच उदाहरण घ्यायचे म्हणाले तर मी खूपच मागे होते. माझ्यासाठी आई बी फार नवीन होते. सगळ्याच गोष्टी फार अवघड वाटत होत्या आणि त्यातच माझी भेट हिरू शी झाली. हिरुनी मग माझी ओळख कुंतलशी करून दिली आणि हळूहळू सर्व प्रश्न सुटत गेले. नुसते प्रश्नच सुटले नाहीत तर माझ्यात आत्मविश्वास आला. मग मी निरनिराळे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली व ते खूप यशस्वी सुद्धा झाले. याचे श्रेय “लाईफरेरीयन असोसिएशन” ला जाते. इथे आई बी च्या “लेअर्नर प्रोफाइल” प्रमाणे आम्ही वागतो तसे बनलो आहोत.

आम्ही तत्त्वनिष्ठ ग्रंथपाल आहोत. इथे ” अकॅडेमिक इंटेग्रिटीं” सांभाळून विद्यार्थी आणि शिक्षकांना लागणारी शालेय तसेच तंत्रज्ञानाची माहीती पुरवितो.

“केरिंग” म्हणजे काळजी इथे एकमेकांची खूपच काळजी घेतली जाते. कोणाला कधीही म्हणजे अगदी परदेशी असो किंवा खूप उशिरा रात्री कोणी जर मदतीसाठी हाक म्हणजे पोस्ट टाकली तर काही मिनिटातच आम्हाला आमच्या अडचणीचे / प्रश्नांचे उत्तर मिळालेले असते. एवढी काळजी खरच कोणीही घेणार नाही.इथे प्रत्येक जण अभ्यासू आणि विचारवंत आहे आणि ते आपले ज्ञान सर्वांमध्ये वाटतात/ पसरवतात. इथे प्रत्येकाला आपले मत मांडण्याची मुभा आहे.

आम्ही या असोसिएशन द्वारे वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्रे भरवितो ज्या द्वारे बाकीच्या सभासदांना नवीन गोष्टी शिकता येतील हे पहिले जाते. हे सर्व आमचे सभासदच करत असतात. आई बी मध्ये नवीन नियम किंवा बदलही आम्हाला या असोसिएशन मुळे ताबडतोब समजतात.

मला हे सांगताना खरच खूप आनंद होतो की इथे मी घडले आणि प्रत्येकला घडविण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो.

धन्यवाद! 

मंजुषा श्रीराम माडीवाले

ग्रंथपाल


SHARE THIS POST

Leave a Reply