Skip to main content

ग्रंथपालाची भूमिका: आजीवन शिक्षण

SHARE THIS POST

प्रिय वाचक,

या ब्लॉग पोस्टद्वारे, आयबी शिक्षणातील ग्रंथपालनाच्या भूमिकेवरील श्रेणी -3 कार्यशाळेदरम्यान घेतलेल्या शिक्षणाचे काही ठळक मुद्दे आपल्यापुढे सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. मला आशा आहे की इतर लाइफ्रेरियन मित्रांना खालील माहितीद्वारे या कार्यशाळेच्या व्याप्तीवर दृष्टीक्षेप टाकण्यास मदत होईल.

ग्रंथपालांसाठी आय बीने ( International Baccalaureate)  आपल्या मार्गदर्शनासाठी विविध दस्तऐवजांमार्फत मानके आणि पद्धतीं (Standards and Practices) तयार केल्या आहेत तसेच त्यांचे पालन करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपविली आहे. या दस्तऐवजांचा (documents) संदर्भ घेतल्यास आम्हाला आय बी संकल्पना सखोलपणे समजण्यास मदत होईल. 

कार्यशाळेच्या शैक्षणिक पद्धतीनुसार, ग्रंथालयांशी निगडीत काही मुद्दे उत्कृष्ट ग्रंथालय पद्धतींसाठी विचारात घेणे आवश्यक आहे:

  • शिकण्याचा आणि शिकवण्याच्या दृष्टीकोनासाठी लागणारी कौशल्ये (ATL Skills)
  • शैक्षणिक अखंडता/ प्रामाणिकपणा ( Academic Integrity), 
  • विद्यार्थी गुणधर्म ( Leaner Profile Attribute),
  • आंतरराष्ट्रीय मानसिकता (International Mindedness),
  • शिक्षण आणि शैक्षणिक पद्धतींचे सातत्य (Continuum of Education and Practices),
  • विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कला आणि गणितीय दृष्टिकोन (STEAM Approach) 
  • शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या दिशेने प्रशिक्षक आणि (Coach towards teaching and learning)
  • शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह साधलेले संसाधन आणि सहकार्य (Resource sharing and collaboration with teachers and students).

आय बी दस्ताऐवज ( IB Documents)

आयबीने आपल्या मार्गदर्शनासाठी तयार केलेले  दस्ताऐवज अतिशय माहितीपूर्ण आहेत, त्यांचे अनुसरण करणे आणि त्यांचा संदर्भ देणे आम्हाला आयबी शिक्षण प्रणाली समजण्यास मदत करते. ग्रंथालयात तंत्रज्ञानाचे एकीकरण आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रंथपाल जबाबदार आहेत. त्यामुळे, ग्रंथालय हे उदयोन्मुख तंत्रज्ञानासह शिक्षण देण्यास  व घेण्यास वाव देणारे जणू एक संशोधन केंद्रच बनते.

तंत्रज्ञान एकत्रीकरण आणि 6 + रचना ( Technology Integration and 6+ Framework)

पारंपारिक स्वरूपापासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतची माहिती ही ग्रंथपालनाचा एक अविभाज्य भाग मानली जाते. ग्रंथपाल म्हणून आपण लोक, ठिकाणे, संकलन आणि सेवांच्या बाबतीत आपली ग्रंथालय व्यवस्था कशी असावी याचे विश्लेषण केले पाहिजे. याकरिता, ग्रंथालय यंत्रणेची ताकद/ आवाका आणि सुधारणेसाठी आवश्यक असणार्या 6+ रचनेवर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे ठरते. यादृष्टीने 6+ रचनेला समाकलित करणारे खालील मुद्दे विचारात घेणे उपयुक्त ठरते.

  • सर्वात अद्ययावत माहिती तयार करणे (Curating the most updated information),
  • संग्रह किंवा सामग्रीची काळजी घेणे (Caretaking the collection or content),
  • ग्रंथालय विज्ञान आणि लोकांची उत्प्रेरके (Catalyzing library science and people),
  • वाचन आणि माहितीचे विविध स्रोत जोडणे (Connecting reading, multi-literacies and various sources of information),
  • शालेय समुदायाच्या सहकार्याने संसाधने तयार करणे (Co-creating resources by collaborating with the school community),
  • आव्हानात्मक माहिती, पद्धती आणि गंभीर विचार करणे (Challenging information, methods and critical thinking),
  • वापरकर्ते: र्विद्यार्थी, शिक्षक आणि पालक समुदायाच्या गरजा पुरविणे (Catering to the users: student, teacher and parent community).

अशा प्रकारे, ग्रंथालये ही  संग्रह, जागा आणि सेवा याद्वारे वापरकर्त्यांशी जोडण्यारी एक आवश्यक घटक मानली जातात.

कार्यशाळेदरम्यान काही माहितीपूर्ण चर्चा घडल्या, ज्याबद्दल आपण सर्वजण विचार करून त्या दिशेने प्रवास सुरू करू शकता:

  • पहिला चर्चेचा मुद्दा होता की आपण स्वतःला विचारणा करणे : तुम्ही उत्कृष्ट ग्रंथपाल आहात का?  (Are you a super librarian?) 
  • आपण कोणत्या प्रकारचे ग्रंथपाल आहात? (Archetype librarian’s quiz ) या प्रश्नमंजुषेमुळे मला ग्रंथपाल म्हणून वाचक, माहितीचे प्रकार आणि सेवांचे वर्णन आणि त्या पुरविण्याची माहिती  मिळण्यास मदत झाली
  • मला आंतरबाह्य वैयक्तिक क्षमता तपासताना माझे सामर्थ्य, कमकुवतपणा, संधी आणि धोका (SWOT Analysis) या विविध प्रकारच्या विश्लेषणात्मक मुद्द्यांची कल्पना आली.
  • नियोजन आणि आव्हाने ( Planning and challenges)
  • मला दैनंदिन ग्रंथालय सेवा, आव्हाने आणि त्यांचे निराकरण करण्याचे मार्ग कसे आणि काय आहेत हे पाहण्यास, नियोजन आणि आव्हानांविषयीच्या चर्चामुळे लक्षात आले. ज्यामुळे, मी सर्व वापरकर्त्यांना ग्रंथालयाच्या वाढीव सेवा सातत्यपूर्ण प्रदान करू शकेन.
  • डी बोनो तत्त्वज्ञान  De Bono philosophy

डी बोनो तत्त्वज्ञानामार्फत झालेली चर्चा, कोणत्याही संस्थेतील ग्रंथपालांच्या भूमिकेचे महत्त्व तसेच त्यांच्यावरील जबाबदार्यांसंबंधिचे स्पष्टीकरण समजून घेण्यास उपयुक्त ठरली. शिक्षक ग्रंथपाल हेप्रसार विशेषज्ञ ( Media Specialist) म्हणून नवनवीन कौशल्ये विकसित करण्याच्या दिशेने कार्यरत राहून; आधुनिक तंत्रज्ञान आणि अध्यापनशास्त्राच्यादृष्टीने विद्यमान पद्धती मजबूत करण्याच्या अपेक्षांना पुरते उतरतात.

ग्रंथपालांचे महत्त्व

ग्रंथपालहा कोणत्याही संस्थेतील ग्रंथालय व्यवस्था सुरळीतपणे चालविण्यासाठी तसेच त्याला लागणार्या मूलभूत गरजा भागविणारा एक मुख्य घटक आहे; संस्थेतील सदस्यांनी हे लक्षात घेणेही तितकेच आवश्यक आहे.

हया अभ्यासक्रमामुळे मला आयबी शिक्षण पद्धती तिचा समग्र दृष्टिकोन आणि ज्ञानाची प्रचिती आली. हे प्रशिक्षण मला आजीवन शिकत राहण्याच्या ब्रीदवाक्याशी परिचित करते यात शंकाच नाही. नवीन संकल्पनांचे स्वागत, स्वीकार आणि अनुसरण करणे आवश्यक आहे. मला असे वाटते की, शालेय समुदायाला सामाजिकभावनिक आधार देण्यास आणि प्रोत्साहित करण्यास हे शिक्षण मला फार उपयुक्त ठरले आहे. माणूस हा कायम एक विदयार्थी असतो जो सतत काहींना काही शिकत असतो आणि ही शिक्षणाची भावना आपल्याला मजबूत बनवून आपला व्यावसायिक विकास घडवत राहते.

इतर सहभागींनी वाचण्यासाठी सादर केलेली अतिरिक्त संसाधने:

  1. Connected Learning Alliance 
  2. Connected Learning Research Network 
  3. Chicago Learning Exchange 
  4. KQED by PBS
  5. Excited Educator
  6. Young Adult Library Service Association

आरती सिराम (डॉन बॉस्को इंटरनॅशनल स्कूल, माटुंगा, मुंबई)

 


SHARE THIS POST

Leave a Reply